Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: दिराचा भावजयीवर गोळीबार- Fired

अहमदनगर ब्रेकिंग: दिराचा भावजयीवर गोळीबार- Fired

Ahmednagar Dira's brother-in-law fired

Ahmednagar | अहमदनगर: पोहेगाव येथील शनी मंदिर राजवाडा परिसरात  दिराने भावजयीवर गोळीबार (Fired) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पोहेगाव हादरलं आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे.

सुनीता संजय भालेराव (वय 32) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून घटना घडल्यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार  झाला आहे.

या घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवाय एस पी संजय सातव, पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे, दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोपी विशाल सुनील भालेराव हा महिलेचा दिर असुन त्याच्यासोबत सिद्धार्थ कदम व अमोल भालेराव होते. आरोपी विशाल भालेराव याने बाहेरून गावठी कट्टा आणत जखमी भावजयी सुनिता भालेराव यांना दाखवला.

हा गावठी कट्टा दाखवण्याच्या नादात आरोपींकडून घोड्याचा खटका ओडला गेला आणि सुनिता भालेराव यांच्या डोक्यात गोळी आरपार घुसली. प्रत्यक्षदर्शी कुटुंबातील साहिल नितीन भालेराव, कल्पेश सुनील, भालेराव, काजल कल्पेश भालेराव यांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला आधी खाजगी रुग्णालयात नंतर शिर्डी व नंतर लोणीला हलवले. गोळीबारात सुनिता भालेराव या गंभीर जखमी असून आरोपीचा शोध घेण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशन कडून पथक रवाना झाले.

Web Title: Ahmednagar Dira’s brother-in-law fired

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here