अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड: अखेर शल्य चिकित्सक पोखरणाला अटक
Ahmednagar District Hospital fire | अहमदनगर: येथील जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखराणा यास अखेर सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोखरणाची सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास सुटका करण्यात आली. अधिक तपास उप विभागीय अधिकारी अनिल कातकाडे करत आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड आयसीयु सेंटरला ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखराणा याने जिल्हा न्यायालायात सादरीकरण करत अटकपूर्व जामीन मागितला होता.
वाचा: Ahmednagar News
याप्रकरणाची राज्यस्तरीय समितीकडून चौकशी सुरु होती. या समितीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून पोखराणा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखराणा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला. त्याला सोमवारी चार वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोखरणाची सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास सुटका करण्यात आली. अधिक तपास उप विभागीय अधिकारी अनिल कातकाडे करत आहे.
Web Title: Ahmednagar District Hospital fire: Pokhrana finally arrested