Home अहमदनगर एमआयडीसीतील कंपनीला लागलेल्या भीषण आगीत एका कर्मचार्‍याचा मृत्यू

एमआयडीसीतील कंपनीला लागलेल्या भीषण आगीत एका कर्मचार्‍याचा मृत्यू

Ahmednagar employee died in a fire at a company in MIDC

अहमदनगर: नागापूर एमआयडीसीत सन फार्मा ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट असून आतील एका प्लॉन्टला बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान आग लागली. प्लॅटला दोन कर्मचार्‍यांची ड्युटी होती. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व अहमदनगर महानगरपालिकाच्या चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान, कंपनीतील कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून यामध्ये जिवीतहानी झाली का नाही यासह किती नुकसान झाले याबाबत  माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नाही. आगी बाबत माहिती देण्यास कंपनी व्यवस्थापनाने नकार दिला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Ahmednagar employee died in a fire at a company in MIDC

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here