Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: गोदावरी नदी पात्रात चार तरुणांचा बुडून मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: गोदावरी नदी पात्रात चार तरुणांचा बुडून मृत्यू

Ahmednagar News: प्रवरासंगम कायगाव येथे चौघा तरुणांचा पाण्यात बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना.

Ahmednagar Four youth drowned in the Godavari river 

नेवासा: नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम कायगाव येथे चौघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील काही तरुण कायगाव येथे आले होते. त्यांचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. दुपारी साडेतीन ते चार च्या दरम्यान ही घटना घडली. पाण्यात पडलेल्यांमध्ये बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), आकाश भागिनाथ गोरे (वय 20) व शंकर पारसनाथ घोडके (वय 22) या चौघांचा समावेश आहे. दरम्यान शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून अन्य तिघांचे मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. हे सर्व चौघे वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी आहेत.

Web Title: Ahmednagar Four youth drowned in the Godavari river 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here