बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेला बोकडच पळविला
श्रीरामपूर | Ahmednagar: बिबट्याला पकडण्यासाठी सावज म्हणून पिंजऱ्यात ठेवलेला बोकडच अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. हा बोकड टार्गेट मुलांनी किंवा चोरट्यांनी चोरून नेल्याची चर्चा आहे.
श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात येथे सूर्यनगर परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. या बिबट्याने एका हरिणाची देखील शिकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही बिबट्याने अनेकांना दर्शन दिले आहे.
सूर्यनगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने १९ जून रोजी बिबट्यासाठी पिंजरा लावला होता, बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी सावज म्हणून एक बोकड बोकड पिंजऱ्यात ठेवण्यात आला होता. मात्र काल कोणीतरी अज्ञाताने बिबट्याच्या पिंजऱ्यातील बोकड चोरून नेला. हा बोकड कोणी चोरून नेला याबाबत शोध सुरु आहे. चोरट्यांनी किंवा टार्गेट्स तरुणानी बोकड पार्टी करण्यासाठी हा बोकड चोरला असावा अशी परिसरात चर्चा आहे.
Web Title: Ahmednagar goat kept in the cage was caught to catch Bibatya