सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यास मागितली दोन कोटींची खंडणी
श्रीरामपूर| Ahmednagar: श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले (वय 42 वर्ष) यांना काल एका अज्ञाताने व अनोळखी व्यक्तीने मोबाइल नंबरवरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याची घटना समोर आली आहे.
या खंडणीखोराने दोन कोटी रुपये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एका इमारतीत येण्याचे सांगितले. तसेच पोलिसांना कळवले तर त्रास होईल अशी धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे देखील पथकासह श्रीरामपूर शहरात हजर झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत.
Web Title: Ahmednagar Gold and silver traders demand Rs 2 crore ransom