Home अहमदनगर Murder: हॉटेलमध्ये मारहाणीत वेटरचा खून

Murder: हॉटेलमध्ये मारहाणीत वेटरचा खून

Ahmednagar Hotel Waiter Murder Case 

अहमदनगर | Murder: एका वेटरने दुसऱ्या वेटरचे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत खून केल्याची घटना नगर तालुक्यातील जामखेड रोडवरील आठवड येथील हॉटेल सार्थकमध्ये सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळी या दरम्यान ही घटना घडली.

कैलास घोडके वय ५५ असे मयत वेटरचे नाव आहे. संतोष तुळशीराम सुरदुसे रा. दर्यापूर जि. अमरावती असे आरोपीचे नाव आहे,

याप्रकरणी हॉटेल मालक संजय नवनाथ खाकाळ यांनी नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत कैलास व आरोपी संतोष हे दोघे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होते. या दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत होती. सोमवारी रात्री भांडण होऊन दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यावेळी सुरदुसे याने कैलास याला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून टाकले. यातच कैलास याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उप निरीक्षक युवराज चव्हाण हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar Hotel Waiter Murder Case 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here