प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकरास आजन्म कारावास
अहमदनगर | Ahmednagar: एकतर्फी प्रेमातून प्रदीप माणिक कणसे वय २४ रा. लातूर याने प्रेयसीची कोयत्याने वार करून हत्या केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी प्रदीप कणसे याने नगर शहरातील बुरूडगाव रोडवरील जुना जकात नाक्याजवळ घरात घुसून मोहिनी तानाजी सूर्यवंशी हिची कोयत्याने वार करून हत्या केली होती. ही घटना २७ मे २०१६ रोजी घडली होती. मोहिनी ही तिच्या नातेवाईक यांच्याकडे राहत होती. ती मुळची रा.हाडगा ता. निलंगा, जि. लातूर येथील होती. आरोपी कणसे हा तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तिला वारंवार त्रास देत होता. घटनेच्या अगोदर कणसे हा नगरमध्ये आला होता. त्याने एका दुकानात कोयता खरेदी केला आणि मोहिनी राहत असलेल्या घरी गेला. यावेळी मोहिनी घराच्या छतावर एकटीच असल्याचा फायदा घेत मोहिनी हिस लग्नाची मागणी केली. मात्र मोहिनीने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने कणसे याने तिच्यावर कोयत्याने वार करून तिची हत्या करण्यात आला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर या गुन्ह्याचा उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषरोप दाखल केले.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद व समोर आलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Life imprisonment for a lover