Home Ahmednagar Live News अहमदनगर: महिलेचा विनयभंग करीत जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर: महिलेचा विनयभंग करीत जीवे मारण्याची धमकी

Ahmednagar Molestation of a woman and threaten

अहमदनगर  | Ahmednagar: एका तरूणाने दरवाजा तोडून बळजबरीने घरात घुसून महिलेचा विनयभंग (Molestation of a woman)  केल्याची घटना एका उपनगरातून समोर आली आहे.  वेळोवेळी फोन, मेसेज करत ब्लॅकमेल करून जीवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली असल्याची फिर्यादीत म्हंटले आहे.

याबाबत नगर येथील एका उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी किरण हरीभाऊ साबळे, त्याची आई व पत्नी (रा. बोल्हेगाव) यांच्याविरूध्द विनयभंग, मारहाण, धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल (crime) करण्यात आला आहे.

किरणने फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनेकवेळा फोन केल्याने त्यांनी त्याचा नंबर ब्लँक लिस्टमध्ये टाकला होता. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास किरण हा दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरासमोर आला. फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजा तोडून आत प्रवेश केला. फिर्यादीसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग (Molestation)  केला. त्यांची आई तेथे आली तिने फिर्यादीला मारहाण केली. माझ्याविरूध्द पोलिसांत तक्रार दिली तर तुला आम्ही जिवंत मारून पुरावा नष्ट करू,  तुला आत्महत्येस मजबुर करून,  अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Ahmednagar Molestation of a woman and threaten

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here