अहमदनगर | Ahmednagar: भायाने महिला वकिलाचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिला वकिलाने फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी अहमदनगर शहरात फिर्यादीच्या राहत्या घरासमोर ही घटना घडली. पोलिसांनी फिर्यादीच्या भायाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत महिला वकिलाने म्हटले आहे की, सोमवारी सकाळी राहत्या घरासमोर तुळशीला पाणी घालत असताना आमच्या घराच्या समोर राहणारा आमचा भाया हा माझ्याकडे पाहून मला म्हणाला की, ‘माझ्याकडे ये माझ्याकडे कोणी नाही’, असे म्हणत त्याने फिर्यादीशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
Web Title: Ahmednagar Molestation of a woman lawyer