Home अहमदनगर अहमदनगर: महिला वकिलाचा विनयभंग

अहमदनगर: महिला वकिलाचा विनयभंग

Ahmednagar Molested of a woman lawyer

अहमदनगर  | Ahmednagar: एका 80 वर्षीय वयोवृध्द पक्षकाराने एका महिला वकिलाचा विनयभंग (molested) करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. एका उपनगरात राहणार्‍या महिला वकिलाने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग करणारा दशरथ तुकाराम गायकवाड (वय 80 रा. भोयरे पठार खुर्द ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील एका वकिलाकडे फिर्यादी ज्युनीयर असिस्टंट म्हणून काम करत असताना त्या वकिलांचा जुना पक्षकार असलेला गायकवाड त्यांच्या कार्यालयात नेहमी येत असे. तेथे तो फिर्यादीजवळ येऊन बसत असे व त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहत असे. याबाबत फिर्यादी यांनी त्यांच्या वकिलांना याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी वकिलांनी गायकवाडला कार्यालयात येण्यास बंदी घातली होती.

मंगळवार, 19 एप्रिल 2022 रोजी गायकवाड हा फिर्यादीला म्हणाला,‘तू माझ्याशी बोलत रहा, माझ्याशी संबंध ठेव, नाही ठेवले तर तुझी बदनामी करेन’, फिर्यादी तेथून निघून गेल्यानंतर त्याने त्यांचा पाठलाग केला व मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणत फिर्यादीच्या अंगाला स्पर्श केला. फिर्यादीने त्यास विरोध केला असता त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तोफखाना पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Molested of a woman lawyer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here