Home अहमदनगर Suicide: माय-लेकाची विषारी औषध प्राशन  करून आत्महत्या

Suicide: माय-लेकाची विषारी औषध प्राशन  करून आत्महत्या

Ahmednagar My-Lake commits suicide by ingesting the poisonous drug

अहमदनगर | Ahmednagar:  कॉफीतून विषारी पदार्थाचे सेवन करून माय-लेकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.  सावेडी उपनगरातील तपोवन रोडवर रविवारी ही घटना घडली.

रंजना सुरेंद्र गांधी (वय 65) व तिचा मुलगा हिमांशु सुरेंद्र गांधी (वय 35 दोघे रा. तपोवन रोड, नगर) असे मयत झालेल्या माय-लेकाचे नाव आहे.  याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एका बँकेच्या कर्जाला (Bank Loan) कंटाळून त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याची  प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी पहाटे रंजना व हिमांशु यांनी कॉफीमधून विषारी औषधाचे सेवन केले. त्रास होऊ लागल्याने हिमांशु याने 108 नंबरवर फोन करून रूग्णवाहिका बोलून घेतली. रुग्णवाहिकेतून दोघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान औषध उपचारापूर्वीच रंजनाचा मृत्यू झाला. तर हिमांशुवर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या खबरीवरून तोफखाना पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत गांधी यांच्यावर एका बँकेचे कर्ज असल्याचे बोलले जात असून त्याला कंटाळूनच त्यांनी विष प्राशन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Ahmednagar My-Lake commits suicide by ingesting the poisonous drug

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here