अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेर अकोले तालुक्यात सर्वाधिक
अहमदनगर | Ahmednagar News Corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७३४ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर व अकोले तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्याखालोखाल अकोले तालुक्यातही रुग्णसंख्या वाढीला सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यात १४७ तर अकोले तालुक्यात १०३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: १४७
अकोले: १०३
श्रीगोंदा: ८७
पारनेर: ६४
शेवगाव: ४७
कर्जत: ४४
नगर ग्रामीण: ३८
राहुरी: ३८
राहता: ३४
नेवासा: ३१
पाथर्डी: २७
मनपा: २२
कोपरगाव: १८
श्रीरामपूर: १८
जामखेड: १२
इतर जिल्हा: ४
भिंगार: ०
मिलिटरी हॉस्पिटल:०
इतर राज्य: ०
असे एकूण ७३४ रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona update Today 734