Home अहमदनगर एका खासगी रुग्णालयात हाणामारी, चौघांवर गुन्हा दाखल

एका खासगी रुग्णालयात हाणामारी, चौघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News Fighting at private hospital, four charged

अहमदनगर | Ahmednagar News: रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेचा पती आणि फॅन दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीमध्ये जोरदार हाणामारी झाली. शहरातील सिद्धार्थनगर येथील वैभव रुग्णालयात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमोल लक्ष्मण रणसिंग वय ३३ रा. केडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू पाटोळे याच्यासह त्याच्या मुलाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणसिंग हे त्यांच्या पत्नीस उपचारासाठी वैभव क्लिनिकमध्ये घेऊन आले होते. त्यांना रुग्णालयात सलाईन देण्यात येत होते. ज्या बेडवर सलाईन लावले होते तेथे उभा राहून राजू पाटोळे हा फॅन दुरुस्त करत होता. यावेळी रणसिंग यांनी तुम्ही नंतर फॅन दुरुस्त करा असे पाटोळे यांना सांगितले तेव्हा पाटोळे याने रणसिंग यांस मारहाण करीत शिवीगाळ केली तसेच त्यांना पत्नीसह ढकलून दिल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली असे फिर्यादीत म्हंटले आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

राजू शिवाजी पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल रणसिंग व त्यांच्या मामाविरोधात मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात रणसिंग याने विनाकारण मारहाण केली. तसेच घरी येऊनही पाटोळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी पाटोळे यांच्या पत्नीसही मारहाण केली असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Ahmednagar News Fighting at private hospital, four charged

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here