Home अहमदनगर धक्कादायक: देवीचे पुजारी कुटुंब कोरोनाबाधित, भाविकांची धाकधुक वाढली

धक्कादायक: देवीचे पुजारी कुटुंब कोरोनाबाधित, भाविकांची धाकधुक वाढली

Ahmednagar News priestly family of the goddess is coronated

अहमदनगर | Ahmednagar News: नगर शहराजवळील बृहाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिरातील पुजारी कुटुंब कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यांचा मंदिरात वावर असल्याचा आरोप बृहाणनगर येथील ग्रामस्थांनी केला आहे. गुरुवारी शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. त्यामुळे भाविकांची धाकधुक वाढली आहे. कोरोनाचे निदान झाल्याचे पुजारी यांनी मान्य केलं आहे. मात्र त्यांनी योग्य ती खबरदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

गावकऱ्यांनी यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.

संसर्ग झाल्यानंतरही पुजारी कुटुंब विलगीकरण कक्षामध्ये न जाता मंदिरामध्ये फिरत आहे. मंदिरात राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे त्यांना करोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. करोना रुग्ण वाढल्यास याची जबाबदार जिल्हा प्रशासनाची असेल, असे निवेदनात म्हटलं आहे.

भाविकांसाठी मंदिर गुरुवारी खुलं झालं आहे. त्यातच हा प्रकार समोर  आला आहे.

नवीन फिचर असलेले पोर्टल वापरण्यासाठी आज अप अपडेट करा येथे: संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Ahmednagar News priestly family of the goddess is coronated

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here