Home अहमदनगर पैसे देण्याघेण्याचे कारणातून एकावर कोयत्याने हल्ला

पैसे देण्याघेण्याचे कारणातून एकावर कोयत्याने हल्ला

Ahmednagar News scythe attack on one of the payers

अहमदनगर | Ahmednagar News: पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून एका जणावर दोघांनी कोयत्याने व दगडाने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील हातवळण शिवारात रविवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दाखल झाली आहे.

या हल्ल्यामध्ये परसराम दशरथ नवसुपे वय ३५ मठपिंप्री ता. नगर हे जखमी झाले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिवाजी विश्‍वनाथ चेमटे (रा. हातवळण) व नामदेव निकम (पूर्ण नाव माहिती नाही रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परसराम नवसुपे व आरोपी यांच्यात जनावराच्या गोठ्यात मुरूम टाकण्यासाठी पैशाचा व्यवहार झाला होता. याच कारणातून रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवाजी चेमटे याने हातातील कोयत्याने परसराम यांच्या पाठीमागून डोक्यात वार केला. तसेच नामदेव निकम याने परसराम यांच्या पाठीत दगड मारला. या मारहाणीत परसराम नवसुपे जखमी झाले आहेत. जखमी नवसुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

Web Title: Ahmednagar News scythe attack on one of the payers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here