Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात या २२ गावांत पुन्हा कडक लॉकडाऊन, शाळेत विलगीकरण

अहमदनगर जिल्ह्यात या २२ गावांत पुन्हा कडक लॉकडाऊन, शाळेत विलगीकरण

Ahmednagar News Strict lockdown again in these 22 villages 

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली आहे मात्र पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या ही जास्तच राहिली आहे. त्यामुळे पारनेर तालुक्याची चिंता वाढली आहे.  जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे पारनेर तालुक्यात आढळून येत आहे. काहींच्या मते मुंबईहून येणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्ण वाढत आहे. मात्र आता प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तालुक्यात भेटी दिल्या आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या २२ गावांत ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच १०० टक्के चाचण्या घेण्यात येणार आहे. गावांतील शाळांमध्ये विलगीकरण करण्यात येणार आहे.

तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले की, तालुक्यातील निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड,खडकवाडी, सावरगाव, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलंखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, वाळवणे या गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे.

पुढील आठ दिवस या गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. बाहेरुन आलेले पाहुणे सात दिवस शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहेत. विविध ठिकाणी चालक म्हणून काम करणाऱ्या गावातील नागरिकांनी गावात आपल्या घरी न राहता शाळेतील विलगीकरणातच राहायचे आहे. विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणारे यांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. कोविड विसंगत वर्तन करणाऱ्यांना सरळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

Web Title: Ahmednagar News Strict lockdown again in these 22 villages 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here