Home अहमदनगर नगर जिल्ह्यात रात्रभर संततधार, नद्यांना पूर, पूल पाण्याखाली

नगर जिल्ह्यात रात्रभर संततधार, नद्यांना पूर, पूल पाण्याखाली

Ahmednagar News today rain at night

अहमदनगर | Ahmednagar News today: सोमवार सायंकाळपासून रात्रभर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाउस सुरु होता. आजही सकाळपासून संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला असून नद्या नाल्यांना पूर आलेला आहे.

नगर शहरासह तालुका, पारनेर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह पाउस सुरु होता, रात्रभराच्या पावसाने सीना नदीला पूर आला आहे. पावसाने अनेक घरात पाणी शिरले आहे. नगर कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठची अनेक घरे पाण्याखाली गेली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नगर तालुक्यातील जेऊर गावाची  संपूर्ण बाजारपेठ पाण्यात गेली आहे. सीना व खारोळी नदीला महापूर आला आहे,

तिसगाव गर्भगिरीत रात्रभर सलग १० तास पाउस झाला. यावर्शिक पाहिलाच पूर नद्याना आला आहे, अजूनही पावसाचा जोर कायम आहे.  

Web Title: Ahmednagar News today rain at night

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here