Home अहमदनगर अहमदनगर पुढील ३ दिवस यलो अलर्ट, राज्यात जोरदार पावसाची शक्यता

अहमदनगर पुढील ३ दिवस यलो अलर्ट, राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Ahmednagar news Today whether alert

अहमदनगर | Ahmednagar News Today:  नगर जिल्ह्यासह राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात सध्या मान्सूनचे ढग दाटून आले आहे. काही भागात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात थोड्याफार फरकाने पावसाळी वातावरण राहणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारच्या जिल्ह्यांना पावसाचा अधिक फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या

चप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील डोंगराळ भागात पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागाने वर्तविले आहे.  तसेच नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पिकांची काढणी सुरु केली आहे. कापणी केलेल्या पिकांची संरक्षण करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावधानता बाळगावी लागणार आहे.

Web Title: Ahmednagar news Today whether alert

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here