Home अहमदनगर ऑनलाईन गंडा घालणारी  नायजेरियन टोळी जेरबंद

ऑनलाईन गंडा घालणारी  नायजेरियन टोळी जेरबंद

Ahmednagar Nigerian gang involved in online gangs arrested

अहमदनगर | Ahmednagar: व्यावसायात लाखो रुपये मिळतील असे नगर येथील हॉटेल व्यावसायिकास आमिष दाखवून १४ लाख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला सायबर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे.

या नायजेरिन टोळीने केडगाव येथील ओंकार मधुकर भालेकर यांच्याशी फेसबुकच्याच्या माध्यामातून मैत्री करून फसवणूक केली होती. भारतातातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आमच्या कंपनीला हर्बल आईल खरेदी करावयाचे आहे. या व्यावसायात तुम्ही सहभागी झाले तर लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखवून आरोपींनी भालेकर यांना लाखो रुपयंचा गंडा घातला. वेगवेगळी कारणे सांगून बँक खात्यावर पैसे मागवून घेतले. याप्रकरणी भालेकर यांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतिक कोळी व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

स्टोनली स्मित मूळ नायजेरिया हल्ली पिंपरी चिंचवड पुणे, निशा शहा, अलेक्स मार्क, अलेन  हल्ली सर्व रा. पिंपरी चिंचवड असे या अटक केल्याला चार जणांची नावे आहेत.

Web Title: Ahmednagar Nigerian gang involved in online gangs arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here