अहमदनगर | Ahmednagar: निंबळक येथ चालकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निंबळक शिवारातील लामखेडे पेट्रोलपंपाजवळ चालकाचा मृतदेह आढळून आला.
रामदास बन्सी पंडित वय ४५ रा. निंबळक ता. नगर असे या खून झालेल्या चालकाचे नाव आहे. हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
रामदास पंडित हे केडगावला चालक म्हणून कामाला होते. बुधवारी रात्री केडगाव येथून घरी फोन करून सांगितले की, मी घरी येतोय अशी माहिती कुटुंबाला दिली. त्यानंतर रामदास घरीच आले नाही. त्यांचा फोनसुद्धा बंद लागत होता. त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
रामदास यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी बायपासवर निंबळक शिवारात लामखेडे पेट्रोल पंपावर आढळून आला.
दरम्यान सकाळी माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविचेदनासाठी रुग्णालयात देण्यात आला.
याप्रकरणी त्यांचा मुलगा अशोक रामदास पंडित यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Web Title: Ahmednagar Driver’s murder
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436