Home अहमदनगर पत्नीवर वाईट नजर ठेवणाऱ्या तरुणाला घाटात नेऊन खून

पत्नीवर वाईट नजर ठेवणाऱ्या तरुणाला घाटात नेऊन खून

Ahmednagar Parner young man murder

अहमदनगर | Ahmednagar: पत्नीवर वाईट नजर ठेऊन तिला त्रास दिल्याने सदर महिलेच्या पतीने भावाची मदत घेऊन तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. तरुणाला खडकवाडी ता. पारनेर घाटात नेऊन त्याचा खून करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पारनेर पोलिसांना २६ जुलै रोजी खडकवाडी घाटात कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी तीक्ष्ण हत्यार वापरून खून झाल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी या मयत व्यक्तीची चौकशी केली. तेव्हा मयत व्यक्ती हा राघू सहादू कोकरे वय ४५ रा. ढवळपुरी ता. पारनेर असे असल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी मयताची पत्नी जनाबाई राघू कोकरे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार सुरेश राजाराम खताळ वय ३२ व भाऊ संतोष राजाराम खताळ रा. खारवाडी, ढवळवाडी ता. पारनेर यांनीच हा खून केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी सुरेश याला ताब्यात घेत विचारपूस केली असता मयत राघू कोकरे याने २१ जुलै रोजी सुरेश खताळ यांच्या पत्नीवर वाईट नजर ठेऊन तिला त्रास दिला होता. याचा राग मनात धरून सुरेश याने भाऊ संतोष यांच्या मदतीने खडकवाडी येथे नेऊन ठार मारले असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले. पोलिसांनी संतोष खताळ याला अटक करण्यात आली आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी याने २४ तासांत गुन्ह्याचा तपास लावत आरोपींना अटक केली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Ahmednagar Parner young man murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here