Home अहमदनगर चिंताजनक: त्या’ शाळेतील आणखी दोन विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह

चिंताजनक: त्या’ शाळेतील आणखी दोन विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह

Ahmednagar pathardi Corona News Update

पाथर्डी | Ahmednagar pathardi Corona News Update : पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केली असता शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलांना करोनाची लागण होत असल्याचे प्रमाण वाढत असून त्याचाच एक भाग म्हणून याचे लोन पाथर्डी तालुक्यातही आले असून डमाळवाडीतील सात विद्यार्थी करोना बाधीत झाल्याचे पुढे आले आहे. मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने शिक्षण विभागाने 23 डिसेंबर पर्यंत ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान मागील आठवड्यात अशीच मुबई येथील घोणसर वाडी येथे १६ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले होते. शाळेत कोरोना नियमांचे पालन करण्याचे गरज असल्याचे समोर आले असून अशा बाबी घडत असतील तिसऱ्या लाटेस आमंत्रण असे तज्ञांचे मत आहे.  

सर्व विद्यार्थ्यांची तब्येत चांगली असून काळजी करण्यासारखे नाही. असे असले तरी पुढील काही दिवस विद्यार्थ्यांची वैदयकीय परिस्थिती पाहून व आरोग्य विभागाचे मार्गदर्शन, पालकांशी चर्चा केल्यानंतरच येथील शाळा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल तोपर्यंत उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाईल. – अभयकुमार वाव्हळ (गटशिक्षणाधिकारी )

Web Title: Ahmednagar pathardi Corona News Update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here