Home Accident News अहमदनगर: रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अहमदनगर: रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Ahmednagar railway Accident youth Death:  रेल्वे गाडीची समोरून धडक बसल्याने अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Ahmednagar railway Accident youth Death

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारात रेल्वे गाडीची समोरून धडक बसल्याने अज्ञात तरुणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारा नजीक दौंड-मनमाड रेल्वे मार्ग आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अज्ञात तरुणाला रेल्वेची धडक बसली. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा (Injured) होऊन त्यातुन मोठा रक्तस्राव झाल्याने तो जागीच मयत झाला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कोपरगाव रेल्वे पोलिसांनी दिलेल्या खबरीवरून मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू करण्यात आली. अधिक तपास कोपरगाव रेल्वे पोलीस एएसआय आंबेकर व पोलीस कॉन्स्टेबल हाऊंदे करीत आहे.

Web Title: Ahmednagar railway Accident youth Death

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here