Home अहमदनगर नर्सला लग्नाचे आमिष दाखवत ११ महिने वारंवार बलात्कार

नर्सला लग्नाचे आमिष दाखवत ११ महिने वारंवार बलात्कार

Ahmednagar rape a nurse for 11 months

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेली एक २६ वर्षीय तरुणी अहमदनगर येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून खासगी नोकरी करत आहे. फय्याज शेख याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तब्बल ११ महिने वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना राहुरी व नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सध्या ही तरुणी अहमदनगर येथे रूग्णालयासमोरच राहत आहे. या तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार १३ जून २०२० ते ७ मे २०२१ दरम्यान आरोपी फय्याज अस्लम शेख रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी याने फिर्यादी तरुणीवर राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा तसेच नगर येथील माळीवाडा परिसरातील लॉज येथे घेऊन गेला तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

दरम्यान संगमनेर तालुक्यातील या तरुणीची इन्स्टाग्राम माध्यमातून देवळाली प्रवरा येथील फय्याज शेख याच्याबरोबर ओळख होऊन घनिष्ठ संबध निर्माण झाले. नंतर गाठीभेठी झाल्या. याच दरम्यान लग्नाचे वचन देत ११ महिने वारंवार बलात्कार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीने राहुरी पोलिसांत घडलेला प्रकार सांगितला. यावरून फय्याज अस्लम शेख याच्याविरोधात बाल्त्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पसार झालेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar rape a nurse for 11 months

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here