मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, संस्थेशी निगडित सात जणांविरोधात गुन्हा
अहमदनगर | Suicide: संस्थेशी निगडित सात जणांच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २७ वर्षीय तरुणाने तरुणाने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुवर्णज्योत जवळील वांबोरी फाट्यानजीक शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
प्रतिक बाळासाहेब काळे वय २७ असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बहिण प्रतीक्षा काळे हिने प्रतिक नोकरीस असलेल्या एका बड्या संस्थेशी निगडित सात जणांविरोधात प्रतिकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार एमआयडी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महेश गोरक्षनाथ कदम, विनायक दामोदर देशमुख, राहुल जनार्दन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, जगन्नाथ कल्याण औटी, रावसाहेब भीमराव शेळके आणि रितेश बबन टेमक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून हे सर्व एका संस्थेशी निगडीत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
- वाचा: कॉमेडी जोक्स
हे सर्वजण माझा भाऊ प्रतिकला गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक त्रास देत होते. प्रतिकच्या प्रामाणिकपणा मुळे तो गडाख कुटुंबाच्या जवळ गेला होता. यामुळे या सात जणांनी प्रतिकला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याला तू नोकरी सोड, महाराष्ट्रात राहू नको असे सांगण्यात आले होते. त्याची खानावळ बंद पाडण्यात आली.
तसेच बळजबरीने राजीनामा घेण्यात आला पण तो मंजूर केला नाही. हा सर्व अन्याय आणि त्रास प्रतिक घरी नेहमी सांगत होता. अखेर त्रास असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली. या सातही जणांना अटक करून प्रतिकला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बहीण प्रतीक्षा काळे यांनी केली आहे.
Web Title: Ahmednagar Suicide of a young man due to mental distress