Rain: नगर जिल्ह्यात आणखी इतके दिवस यलो अलर्ट
Ahmednagar rain Alert Two Days.
अहमदनगर: नगर जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धरणांच्या पाणलोटासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरूच होता.
संततधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाल्याने वातावरणात थंडी जाणवत होती. पुणे, सातारा या भागात आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणातील पालघर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पुढील दोन दिवस पडणार असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या भागांत ऑरेज आणि यलो अलर्ट जारी
आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर यलो अलर्ट ठाणे 19, 20 सप्टेंबर, रत्नागिरी 17, पुणे घाटमाथा 19,20, जळगाव 18 ते 20, नगर 18 ते 20, सोलापूर 20, औरंगाबाद 18, 19, जालना 18, 19, परभणी 18 ते 20, बीड 20, हिंगोली 18 ते 20, नांदेड 18 ते 20, अकोला 17 ते 20, बुलडाणा 17 ते 20, भंडारा 17 ते 20, चंद्रपूर 17 ते 20, गोंदिया 17 ते 20 तारखेपर्यंत असणार आहे.
Web Title: Ahmednagar Two day Rain Alert