Home अहमदनगर तरुणाने ३६ वर्षीय महिलेला हॉटेलवर नेऊन बलात्कार

तरुणाने ३६ वर्षीय महिलेला हॉटेलवर नेऊन बलात्कार

Ahmednagar young man took a 36-year-old woman to a hotel and raped

अहमदनगर | Ahmednagar: नगर येथील बुऱ्हाननगर येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेला एका २५ वर्षाच्या तरुणाने बळजबरीने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. चेतन गोरख सुपेकर रा. बुऱ्हाननगर ता, नगर असे या तरुणाचे नाव आहे.

हि घटना १५ सप्टेंबर २०२० रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिलेच्या घरी २७ एप्रिलला रात्री आरोपी चेतन गोरख सुपेकर गेला आणि म्हणाला की, मला तुला भेटायचे आहे. बोलायचे आहे. महिलेने मात्र नकार दिल्याने आरोपी चेतन सुपेकर याने तिच्या मोबाईलवर संदेश पाठविला. तेव्हा महिलेने संदेश पाठवू नकोस असे खडसावले. तरी सुद्धा त्याने पिडीत महिलेस तेलीखुंट येथे मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे असे म्हणत बळजबरीने मोटारसायकलवर बसवून बाबुर्डी बेन गावाच्या शिवारात असलेल्या एका हॉटेलात नेऊन जबरदस्तीने बलात्कार केला.

आरडाओरडा केलास तर तुला ठार मारीन अशी धमकी देण्यात आली, याप्रकरणी काल पिडीत महिलेने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली. यावरून आरोपी चेतन गोरख सुपेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar young man took a 36-year-old woman to a hotel and raped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here