अकोले: कोल्हार घोटी रोडवर चारचाकी व दुचाकी अपघातात एक ठार
अकोले: अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रोडवर लोहटेवाडी वस्तीजवळ चारचाकी व दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही दुर्दैवी घटना आज दिनांक ६ जून दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार रावसाहेब काळू गावंडे वय ३५ रा. तम्भोळ याचा जागीच मृत्यू झाला.
अकोले तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविचेदानासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातामुळे गावंडे परिवारावर शोककळा पसरली आहे. रावसाहेब काळू गावंडे हा परिस्थितीने गरीब होता. तो राजूर येथे टेलरिंग चे काम करीत होता. अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
Website Title: Akole Accident on kolhar ghoti Road