Home Accident News अकोले ब्रेकिंग: कंटेनर डोक्यावरून गेल्याने तरुणाचा चेंदामेंदा, जागीच मृत्यू

अकोले ब्रेकिंग: कंटेनर डोक्यावरून गेल्याने तरुणाचा चेंदामेंदा, जागीच मृत्यू

Akole Accident News: वसंतमार्केटसमोर दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Akole Accident young man died on the spot after the container went over his head

अकोले: अकोले शहरातील वसंतमार्केटसमोर दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मित्तल चव्हाण असे मयत तरुणाचे नाव आहे.   

याबाबत अधिक माहिती अशी की,  एम. एच. १७ ए वाय ४५६३ या क्रमांकाच्या पल्सर गाडीवरून मित्तल चव्हाण हा  परप्रांतीय तरुण महात्मा फुले चौकाच्या दिशेने चालला होता. यावेळी अकोले शहरातील कराळे यांच्या दुकानासमोर एम.एच १२ के.पी. ६५२१ या क्रमांकाचा कंटेनर चालला होता. तर हा दुचाकीस्वार थेट कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली घुसला आणि कंटेनर हा तरुणाच्या डोक्यावरून निघून गेल्यामुळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की मित्तल चव्हाण या तरुणाच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. सामाजिक कार्यकर्ते सचिन नाईकवाडी यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे मोठी कोंडी निर्माण झाली. अकोले पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली अन मयताला तरुणांच्या मदतीने रुग्णवाहिकेत ठेऊन शवविचेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.   

Web Title: Akole Accident young man died on the spot after the container went over his head

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here