Home अकोले अकोले: तरुणीचे अश्लील फोटो काढून रस्त्यावर टाकून बदनामी करणारा आरोपी अटकेत

अकोले: तरुणीचे अश्लील फोटो काढून रस्त्यावर टाकून बदनामी करणारा आरोपी अटकेत

Akole Accused arrested for defaming a young woman

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील एका २८ वर्षीय आरोपीने तालुक्यातील गारवाडी आदिवासी समाजाच्या २७ वर्षीय तरुणीचे मोबाईलमधून शूट केलेल्या काही व्हिडियो क्लीप व सुमारे २ रिम कागद भरतील एवढ्या संखेत तयार केलेले अश्लील फोटो गारवाडी गावातील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व मंदिर परिसरात टाकून तरुणीची बदनामी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हा प्रकार समजल्याने पिडीतेच्या वडिलांनी पिडीतेसह अकोले पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. अकोले पोलिसांकडून यातील आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर वय २८ रा. कुंभेफळ या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे.

आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर व व पिडीत तरुणी संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील कृषी विद्यालयात एकत्रित शिक्षण घेत होते. दरम्यान या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आरोपी व पीडिता यांच्यात काही कारणावरून बिनसले. आरोपीने चिडून पिडीतेचे अश्लील अवस्थेतील व्हिडियो क्लीप पिडीतेच्या ओळखीच्या मोबाईलवर टाकल्या. तसेच अश्लील फोटो गारवाडीच्या गावात रस्त्यावर टाकून बदनामी करण्यात आली.

Web Title: Akole Accused arrested for defaming a young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here