Home अकोले अकोले अगस्ती कारखाना निवडणूक: भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढत

अकोले अगस्ती कारखाना निवडणूक: भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढत

Akole Agasti factory election All-party fight against BJP Breaking

अकोले | Akole Agasti Factory Election : शेतकरी नेते दशरथ सावंत व बीजे देशमुख यांच्या पॅनलची अचानक माघार झाल्याने अगस्ती साखर कारखान्यात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप व आरपीआय अशी सर्वपक्षीय दुरंगी लढत होणार आहे. अनुसूचित जाती आहेत. जमाती राखीव जागेसाठी माजी मंत्री मधुकर पिचडविरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्यातील  पारंपरिक सामना रंगणार आहे.

बुधवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. माघारीच्या वेळेच्या आधी काही मिनिटे शेतकरी नेते दशरथ सावंत व बीजे देशमुख यांच्या व्यवस्था परिवर्तन पॅनलची अचानक माधार झाल्याने अगस्तीतील सताधारी  पक्ष  मधुकर पिचडविरुद्ध उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्या सर्वपक्षीय गटात दुरंगी लढत होत आहे.

शेतकरी नेते सावंत व देशमुख यांनी गेली दीड पावणेदोन वर्षांपासून व्यवस्था परिवर्तनासाठी मोट बांधण्यास सुरुवात केली होती. दिवसापर्यंत तालुक्यात मेळावे घेत वातावरण निर्मिती  केल्यानंतर अचानक पैनल उभा न करण्याचा निर्णय घेत सावंत- देशमुख गटाने एकाचवेळेस आपल्या सर्व उमेदवार अर्जाची माघार घेतली. यामुळे दोन पॅनलचे ४२ उमेदवार व अपक्ष ७ असे ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तालुक्यात विधानसभेत गेली ४० वर्ष पिचडविरुध्द भांगरे अशी असे. २०१९ ला पिचड लहामटे लढत होत. पिचड यांची तालुक्यातील सत्ता संपुष्टात आली. आता अगस्तीच्यानिमिताने अनुसूचित जाती- जमाती राखीव जागेसाठी माजी मंत्री मधुकर पिचड विरुद्ध  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्यात पुन्हा एकदा पारंपरिक लढत होत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार डॉकिरण लहामटे, अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, जेष्ठ नेते अशोक भांगरे, काँग्रेसचे मधुकर नवले, माकपचे कॉम्रेड डॉ. अजित नवले, भाकपचे कॉग्रेड कारभारी उगले, आरपीआयचे विजय वाकचौरे हे शेतकरी समृध्दी पॅनलचे नेतृत्व करत आहेत.

शेतकरी समृध्दी पॅनलचे उमेदवार :

अकोले गट- कैलास वाकचौरे, विक्रम नवले, मच्छिंद्र धुमाळ,

इंदोरी गट पाटीलबुवा सावंत, अशोक देशमुख, प्रदीप हासे. कोतूळ गट – यमाजी लहामटे, कैलास शेळके, मनोज देशमुख

देवठाण गट- रामनाथ वाकचौरे, बादशहा बोंबले, सुधीर शेळके.

आगार गट अशोक आरोटे, विकास शेटे, परबत नाईकवाडी.

महिला राखीव सुलोचना नवले, शांताबाई देशमुख.  

अनुसूचित जाती- जमाती राखीव अशोक भांगरे,

इतर मागास प्रवर्ग- मीनानाथ पांडे.

भटक्या विमुक्त सचिन दराडे.

बिगर उत्पादक, संस्था सीताराम गायकर,

माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड हे शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व करत आहेत.

शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :

अकोले गट- माणिक देशमुख, रामनाथ वाकचौरे, संदीप शेटे,

इंदोरी गट- भाऊ खरात, प्रकाश नवले, वैभव पिचड. – कोतूळ गट- रावसाहेब शेळके, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब सावंत.

देवठाण गट- भाऊसाहेब वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, बाळासाहेब उगले…. 

आगार गट- सुनील कोटकर, किसन शेटे, सुधाकर आरोटे,

महिला राखीव- आरती मालुंजकर, रजना नाईकवाडी, अनुसूचित जाती जमाती राखीव- मधुकर पिचड,

इतर मागास प्रवर्ग- बाळासाहेब वडजे.

भटक्या विमुक्त सुभाष काकड,

बिगर उत्पादक/ संस्था- राजेंद्र डावरे,

Web Title: Akole Agasti factory election All-party fight against BJP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here