Home अकोले अकोले: अट्रोसिटीचा खोटा गुन्हा मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

अकोले: अट्रोसिटीचा खोटा गुन्हा मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Akole agitation if the false crime of atrocity is not withdrawn

अकोले | Akole: अट्रोसिटी कायद्याला आमचा विरोध नसून मात्र अकोले तालुक्यात राजकीय द्वेषातून दाखल झालेला अट्रोसिटी चा खोटा गुन्हा मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने देण्यात आला

उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचा अट्रोसिटीला विरोध नसून मात्र राजकीय बळी म्हणून राजकीय हस्तक्षेपातून जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर कोणीही नवीन राजकारनात येणार नाही.

अकोले तालुक्यात आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, मराठा समाज गुण्यागोविंदाने राहतात. सर्व राजकीय कार्यकर्ते एकत्र राहत आहे.  तालुक्यातील जनता शांत व संयमी आहे. या गुन्ह्यामुळे तालुक्यातील वातावरण गढूळ झाले आहे. या समाजा समाजात विनाकारण गैरसमज निर्माण होऊन सामाजिक अशांतता निर्माण होईल.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे हे प्रतिकात्मक असून हा गुन्हा राजकीय आकसापोटी दाखल केला आहे. आठ दिवसांत या गुन्हाचे निपक्ष चौकशी होऊन हा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राज गवांदे, भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास वाकचौरे, शिवसेनेचे नेते शिवाजी पाटोळे, मराठा महासंघाचे ओम काळे, अक्षय आभाळे, राष्ट्रवादी शेतकरी सेलचे तालुकाध्यक्ष जालिंदर बोडके, शिवसेनेचे राम एखंडे, कैलास जाधव, प्रकाश देशमुख, तुकाराम पाटोळे आदी नच्या सह्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री शंभू राजे देसाई, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, पोलीस परिक्षेत्र निरीक्षक नाशिक,  पोलीस अधीक्षक, नगर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यापूर्वी विश्रामगृहावर सकल मराठा सामाजच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये कार्यकर्त्यां आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी दीपक वैद्य, अमोल येवले आदी उपस्थित होते. यावेळी शिवाजी पाटोळे यांनी हा गुन्हा राजकीय पार्श्वभूमीवर दाखल झाला असून आजी, माजी, भावी व न झालेले आमदारांनी यात भाग घेत प्रत्यक्ष गुन्हा नोंदविला आहे. अट्रोसिटी ऐवजी मारहाण अथवा इतर अनेक प्रकारे गुन्हा दाखल करता आला असता परंतु अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करणे दुर्दैवी आहे असे मत शिवसेनेचे नेते शिवाजी पाटोळे यांनी व्यक्त केले.

     “अकोले तालुक्याच्या तीस वर्षाच्या राजकारणात राजकीय फायद्यासाठी अट्रोसिटी चा वापर झाला आहे. हा तालुक्यासाठी काळा दिवस असून मराठा समाज, अदिवासी समाज, दलित समाज यांच्यात राजकीय फायद्यासाठी करण्याचा पायंडा चुकिचा पडेल त्यामुळं सर्व समाजाच्या नेत्यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा.”

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole agitation if the false crime of atrocity is not withdrawn

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here