Home अकोले अकोले: सरकारच्या धोरणाविरोध्दात नागरिकांचा उत्फुर्त बंद

अकोले: सरकारच्या धोरणाविरोध्दात नागरिकांचा उत्फुर्त बंद

अकोले: सरकारच्या धोरणाविरोध्दात नागरिकांचा उत्फुर्त बंद

अकोले  : –  देशात भाजप-शिवसेना सरकारच्या काळात वाढलेल्या महागाईचया विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्कसवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमान  शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने सोमवार दि.१०/९/२०१८ रोजी भारत बंद आंदोलनाची हाक दिली होती. या बंदला आकोलेकरांनी उस्फुर्तपणे असा प्रतिसाद देऊन केंद्र व राज्य शासनांच्या धोरणांची निषेध केला. यावेळी प्रस्तापित सत्ताधाऱ्यांना जनतेची पिळवणुक रोखण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ट नेते यशवंत आभाळे यांनी दिली. 

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height.

जनतेला जगणे मुश्किल झाले आहे, कारण रोजच्यारोज पेट्रोल, डिझेल, कॅरोसिन घरगुती गॅस सिंलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बी-बियाणे, औषधे, खते यांच्या देखील किंमती भरमसाट वाढलेल्या आहेत. शेतामध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. त्यामुळे बळीराजा कर्जबाजारी झाल्याने हताश झाला आहे. वाढत्या इंधन, पेट्रोल, डिझेलच्या भावाचे परिणाम इतर मुलभुत जीवनाश्यक वस्तुच्या किंमतीवर होत असल्याने जनता महागाईमध्ये होरपळून निघत आहे.

खऱ्या अर्थाने भारत बंद आंदोलनामध्ये भाजप -शिवसेना युती सरकारच्या विरोधात आपल्या मनातील चीड व्यक्त करण्याकरण्या करिता सर्वसामान्य जनता स्वयंमस्फुर्तीने उत्स्फुर्त पणे सामील झाल्याने तसेच विशेषत व्यापारी वर्ग यांनी जाचक जी. एस. टी. व्हॅट या करांच्या निषेधार्थ स्वयंमस्फुर्तीने आप-आपली दुकाने बंद ठेवुन या सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. भविष्यामध्ये या साऱ्या आंदोलनाचा परिणाम सत्ताधारी भाजप -शिवसेना युती सरकारला भोगावा लागेल. हाच खरा संदेश देण्याकरीता तमाम जनता या आंदोलनामध्ये सहभागी झाली. या भारत बंद आंदोलनामध्ये अकोले तालुक्यातील राजुर , कोतुळ, देवठाण, समशेरपुर, गणोरे व अकोले शहर या  गावांतील व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवुन स्फुर्तीने  प्रतिसाद दिला. तसेच आंदोलनामध्ये शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरी , व्यापारी , महिला , विद्यार्थी सर्वसामान्य जनता मोठया प्रमाणात सहभागी होवुन दि. १० सप्टेंबर २०१८ चा भारत बंद व अकोले तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अकोले तालुक्यातील तमाम जनतेचे व आंदोलनात सहभागी झालेल सर्व राजकीय पक्षाचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here