Home अकोले अकोले: नातवाला वाचविताना आजोबा नातू दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अकोले: नातवाला वाचविताना आजोबा नातू दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Akole grandfather and grandson both drowned

अकोले | Akole: शाळेला सुट्टी असल्यामुळे कोल्हेवाडी ता. संगमनेर येथील सात वर्षाचा आरुष गर्दनी येथे आजोबा बबन नाईकवाडी यांच्याकडे आला होता.

डोंगराच्याकडेला शेतात कांदा काढण्याचे काम सुरु होते. आरुष तेथूनच लगत असलेल्या भाऊसाहेब दामोधर नाईकवाडी यांच्या शेताजवळ गेला. तो अंघोळीसाठी शेततळ्यात उतरला मात्र त्याला पोहता येत नसल्याने गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार आजोबांनी पाहिला. नातवाला वाचविण्यासाठी ते शेततळ्यात उतरले मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बबन भिकाजी नाईकवाडी वय ५० व आरुष राहुल वामन वय ७ अशी मृतांची नावे आहेत.

आरुष हा बबन नाईकवाडी यांच्या साडूच्या मुलीचा मुलगा होता. गर्दनी शिवारातील  डोंगरच्या कडेला एका बाजूस असलेल्या शेततळ्यात घडलेली घटना बराच वेळ कुणाच्या लक्षात आली नाही.

शेतमालक भाऊसाहेब दामोधार नाईकवाडी हे सायंकाळी ५.३० वाजता फेरफटका मारण्यास गेले असता त्यांना हे दोघे बुडाल्याचे दिसून आले. भाऊसाहेब नाईकवाडी यांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना व पोलिसांना दिली. मृतदेह बाहेर काढण्यात आले अकोले ग्रामीण रुग्णालयात शावविचेदन करण्यात आले. अकोले तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा दुर्दैवी प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Akole grandfather and grandson both drowned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here