Home अकोले अकोले नगरपंचायतवर भाजपचा झेंडा, आमदार डॉ लहामटे व गायकर यांचा दारुण पराभव

अकोले नगरपंचायतवर भाजपचा झेंडा, आमदार डॉ लहामटे व गायकर यांचा दारुण पराभव

Akole Nagar Panchayat Election result 2022

Akole Nagar Panchayat Election result 2022 | अकोले: अकोले नगरपंचायतीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत १७ जागेपैकी १२ जागा जिंकत माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने  स्पष्ट बहुमत मिळविले. तर आ.डॅा.किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला २ व शिवसेनेला २ अशा आघाडीला ४ जागा तर मधुकरराव नवलेच्या नेतृत्वाखालील कॅाग्रेस पक्षाला  १ जागेवर समाधान मानावे लागले.विजयानंतर भाजप च्या कार्यकर्त्यांनी वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य मिरवणूक काढली.गुलालाची मुक्त उधळण,फटाक्याची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

ययानंतर माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयासमोर भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला व विजयी सभा पार पडली.यावेळी कार्यकर्त्यांनी आ डॉ लहामटे, सीताराम गायकर यांचेवर कडक शब्दात टीकास्त्र सोडले.

या निवडणुकीत प्रभाग क्र २ मधून अटीतटीच्या लढतीत  भाजपाचे सागर निवृत्ती चाैधरी हे अवघ्या 3 मतांनी ,प्रभाग ११ तुन धुमाळ वैष्णवी सोमेश्वर  अवघ्या ७ मतानी, प्रभाग क्र १६ मधून शेणकर माधुरी रवींद्र अवघ्या ५ मतांनी  विजयी झाल्या तर सर्वाधिक २६९ मताधिक्क्याने भाजपाचे प्रभाग ८ चे बाळासाहेब वडजे विजयी झाले. तर प्रभाग 9 मधून  भाजपच्या शितल अमोल वैद्य-बिबवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष भिमाताई रोकडे यांचा दारुण पराभव केला. प्रभाग १२ मधून २३६ मताधिक्याने शेख तमन्ना मोहसिन व प्रभाग ३ मधून मनकर प्रतिभा वसंत २२७ मताधिक्याने विजयी झाले.

अकोले नगरपंचायतची निवडणूक राष्ट्रवादी कॅाग्रेसचे तालुक्याचे आमदार डॅा.किरण लहामटे, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष सीताराम पा गायकर,शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिन्नद्र धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी तर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली  होती. या निवडणूक काळात प्रचार सभा, होम टू होम मतदारांच्या भेटी गाठी, रॅली यावर सर्वच पक्षांनी भर दिला होता. निवडणुकीच्या निमित्ताने अकोले तालुक्यात कधी नव्हे एव्हढी व्यक्तिगत निंदा नालस्ती राष्ट्रवादी, सेना व भाजप नेते मंडळी,आजी-माजी आमदार यांचे कडून करण्यात आली.एकमेकांवर चिखलफेक करत  खालच्या पातळीवर टीका करण्यात आल्या . प्रभाग क्र ४ मध्ये तर अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक केली गेली होती. तेथे अतिशय तणावपुर्ण वातावरणात मतदान होऊन तेथे भाजपाचेच सोनाली नाईकवाडी यांनी बाजी मारली त्यांनी त्यांचे कौटुंबिक विरोधक सेनेचे गणेश कानवडे यांचा मोठ्या मताधिकक्याने पराभव केला. विशेष म्हणजे या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख पै. रावसाहेब खेवरे सह जिल्ह्यातील ,तालुक्यातील नेते दिवसभर मतदान केंद्रावर तळ ठोकुन होते.

प्रभाग निहाय उमेदवारांना पडलेले मतदान पुढीलप्रमाणे: 

प्रभाग क्र १ मधून

साै मंडलिक विमल संतु -(शिवसेना) –४१६    ( विजयी)

मंडलिक अलका अशोक -( कॅाग्रेस)– २४५

मंडलिक सुरेखा पुंजा (राष्ट्रवादी बंडखोर)  १०

नोटा ५

————————————–

प्रभाग क्र २ मधून

 चाैधरी शिवाजी आनंदा ( राष्ट्रवादी) -८४

 चाैधरी सागर निवृत्ती ( भाजपा) — १६९ (विजयी)

  चाैधरी सागर विनायक ( कॅाग्रेस) –१६६

नोटा ४

————————————– 

 प्रभाग ३ मध्ये

पांडे मंदा तान्हाजी ( राष्ट्रवादी)– २५४

 मनकर प्रतिभा वसंतराव (भाजपा)- ४८१ (विजयी)

नवले जयश्री  दत्तात्रय (मनसे) –५१

शिंदे ठकुबाई पोपट– ०६

————————————– 

प्रभाग ४ मध्ये

 मैड श्रीकांत सुधाकर   ( शिवसेना)– १२४

हीतेष रामकृष्ण कुंभार (भाजपा)–२५०    ( विजयी)

योगेश मुकुंद जोशी ( अपक्ष)–९४

फैजान शमसुद्दीन तांबोळी ( आय कॅाग्रेस)– १५३

नोटा २ 

————————————– 

,प्रभाग ५ मध्ये

कानवडे गणेश भागुजी -346( शिवसेना)

नाईकवाडी सोनाली लक्ष्मिकांत ( भाजपा)- ४१६( विजयी)

गुजर हर्षल रमेश (मनसे)– ०७

नोटा ०७

————————————– 

प्रभाग ६ मध्ये

रुपवते श्वेताली मिलिंद ( राष्ट्रवादी) –३६३( विजयी)

 घोडके शैला विश्वनाथ,(भाजपा)– २९०

रुपवते  कांचन   किशोर (कॅाग्रेस)– २८

नोटा ०७

————————————–

प्रभाग ७ मध्ये

शेख आरीफ शमसुद्दीन ( राष्ट्रवादी) — ६९३ ( विजयी)

शेख मैनुद्दीन बद्रोद्दीन (भाजपा)– २९६

 ताजणे सचिन सदाशिव     ( भा.क.प) –९०

————————————– 

प्रभाग ८ मध्ये

गायकवाड अशोक दत्तु ( राष्ट्रवादी)- २८८

वडजे बाळासाहेब काशिनाथ,(भाजपा)- ५५७ ( विजयी)

गायकवाड जयराम विठोबा ( शिवसेना बंडखोर)- ४८

गायकवाड शिवाजी रामनाथ ( मनसे)–२०

————————————–

प्रभाग ९ मध्ये

रोकडे भिमा बबन( राष्ट्रवादी)– २१६

वैद्य शितल अमोल,(भाजपा)– ३४७ (विजयी)

————————————– 

प्रभाग १० मध्ये

शेटे नवनाथ विठ्ठल ( शिवसेना)– १३७ (विजयी)

 नाईकवाडी अनिल गंगाधर ( भाजपा)–९२

 शेटे मयुर (कॅाग्रेस) — ६२

 शेणकर संदिप भाऊसाहेब   (राष्ट्रवादी कॅाग्रेस बंडखोर)–९२

नाईकवाडी प्रकाश संपतराव (अपक्ष) ०२

————————————– 

प्रभाग क्र ११ मध्ये

साै.वंदना भागवत शेटे ( राष्ट्रवादी कॅाग्रेस) २५१

साै.वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (भाजपा) २५८ ( विजयी)

साै.वनिता रामदास शेटे (कॅाग्रेस) १४०

————————————– 

 प्रभाग १२ मध्ये

कुरेशी निलोफर गफ्फार ( राष्ट्रवादी) ९९

 तमन्ना मोहसिन शेख (भाजपा)  ४२३ ( विजयी)

 जाधव सुमन सुरेश  ( कॅाग्रेस)  २४

  पवार अनिता शरद   ( शिवसेना बंडखोर) १८७

 ———————————————-

प्रभाग क्र १३ मध्ये

साै.आरती सुरेश लोखंडे (राष्ट्रवादी)  २१६

साै.जनाबाई नवनाथ मोहिते ( भाजपा) २६८ ( विजयी)

साै.अंजली स्वप्निल कर्णिक (कॅाग्रेस) ५२

————————————–

प्रभाग क्र १४ मध्ये

पांडुरंग बाबुराव डमाळे ( राष्ट्रवादी) – १८८

शरद एकनाथ नवले (भाजपा) — २६७ ( विजयी)

राजेंद्र यादव नाईकवाडी (कॅाग्रेस) –२५२

————————————–

प्रभाग क्र १५ मध्ये

नाईकवाडी संतोष कारभारी ( राष्ट्रवादी) — ९७

शेटे सचिन संदिप ( भाजपा) –१९०

नाईकवाडी प्रदिपराज बाळासाहेब (कॅाग्रेस) ३२२(विजयी)

वर्पे अजय भिमराज ( शिवसेना बंडखोर) ०३


प्रभाग क्र १६ मध्ये

कु भांगरे पूजा तुकाराम (राष्ट्रवादी)–९२

शेणकर माधुरी रविद्र,(भाजपा)– १४७ (विजयी

भांगरे  मिना प्रकाश   ( कॅाग्रेस) १४२

पुष्पा शरद भांगरे (बंडखोर सेना) ०६

————————————–

प्रभाग क्र १७

पानसरे आशा रवींद्र ( राष्ट्रवादी)  १५६

शेळके कविता परशुराम ( भाजपा) २९१ (विजयी)

Web Title: Akole Nagar Panchayat Election result 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here