Home अकोले कोणत्या गायीचे वासरू कोणाला पिते हेच समजेना: शिवाजीराव धुमाळ

कोणत्या गायीचे वासरू कोणाला पिते हेच समजेना: शिवाजीराव धुमाळ

Akole Nagar panchayat Election Shivjirao Dhumal 

अकोले | Akole Nagar Panchayat Election: भाजप  व आर पी आय युतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत  अकोले नगरपंचायत निवडणुक प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी विविध वक्त्यांनी विद्यमान आमदारांवर निष्क्रीयतेचा आरोप करीत टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी,शिवसेना काँग्रेस या पक्षांनी जो घोळ घातला त्याची विविध वक्त्यांनी खिल्ली उडवली. भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ यांनी  महाविकास आघाडीवर आपल्या नेहमीच्या शैलीत  जोरदार टीकास्त्र सोडले. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत मी होतो ती शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना आता लाचार सेना झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच कोणत्या गायीचे वासरू कोणाला पिते हेच समजेना अशी टीका विरोधकांवर त्यांनी केली. आघाडी असूनही एकाच प्रभागात आघाडीच्या तीनही पक्षांचे उमेदवार उभे आहेत, राज्यात आघाडीचे असे उदाहरण अभूतपूर्व असल्याचा टोला यावेळी लगावण्यात आला.

अकोले नगर पंचायतच्या भा. ज. पा. व आर पी आय युतीच्या  प्रचाराचा शुभारंभ माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे शुभहस्ते गुजरी बाजार येथे  करण्यात आला.अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ व्यापारी  सुभाष कोळपकर हे होते. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड,साै.हेमलताताई पिचड,जि.प.सदस्य कैलासराव वाकचाैरे,जेष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ,जालिंदर वाकचाैरे,गिरजाजी जाधव, ॲड के.डी धुमाळ,आर.पी.आय नेते विजयराव वाकचाैरे, जे.डी.आंबरे,भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,ॲड.वसंतराव मनकर,यशवंतराव आभाळे,चंद्रकात सरोदे,शांताराम संगारे, कल्पनाताई सुरपुरीया, सुधाकर देशमुख,परशराम शेळके,भाजपा अल्पसंख्याक राज्याचे शब्बीरभाई शेख,जिल्हा भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष असिफ पठाण, मुख्याद्यापक राजु अत्तार,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी सागर चाैधरी,साै.प्रतिभाताई मनकर,सोनालीताई नाईकवाडी,  शैलाताई घोडके ,मैनुद्दीन शेख,बाळासाहेब वडजे,शितल वैद्य,अनिल नाईकवाडी, तमन्ना शेख,सचिन शेटे,माधुरी शेणकर, कविता शेळके या  उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला.

माजी मंत्री  पिचड म्हणाले कि आमदारांनी कालव्याचे म्हाळादेवी जलसेतुच्या एका पाईप हलविण्याचे कामासाठी सर्वपक्षीय आंदोलन केले व एक महिन्यात काम करुन पाणी देवु असा शब्द दिला होता. त्याला चार महीने होऊन गेले तरी अद्याप पाण्याचा तपास नाही. तालुक्यात आमदार बदलता येईल मात्र अकोले तालुका वगळून गेलेला रेल्वेमार्ग बदलता येणार  नाही. तालुक्यातील देवठाणहुन जाणारा रेल्वेमार्ग आता साकुर मार्गे नेला जात आहे, हा आमदारांचा नाकर्तेपणाचा आसल्याची टीका त्यांनी केली.

आक्रमक शैलीत केलेल्या भाषणात माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, अकोले नगरपंचायत निवडणूकीसाठी आपण दिलेले सर्व उमेदवार उच्चशिक्षित, सुशिक्षित आहे कुणावरी कसलाही गुन्हा दाखल नाही,सर्व जण चारित्र्य संपन्न उमेदवार आहे .मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला.कोविड  काळात शहरातील व्यापाऱ्यांना मोठा त्रास  सहन करावा लागला. अनेक व्यापाऱ्यांचे खाली दुकान असते व वरच्या मजल्यावर ते राहतात. बाहेरून घरात येतांना दुकानाचे  शटर  थोडे खाली राहिले तरी पाच – दहा हजारांच्या पुढे दंड करण्यात आला.अशी जुलमी दंड आकारणी होत असतांना आमदारांचनी एखादा फोन करून प्रशासकाला  व्यापाऱ्याना मदत करण्याच्या सूचना केल्या नाहीत,व्यापाऱ्यांना दिलासा दिला नाही.करोना च्या संकट काळात कार्यकर्त्यांनी सामाजिक संस्थानी,शिक्षकांनी लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारले मात्र आमदार म्हणून यांनी करोना काळात काय काम केले असा सवाल त्यांनी केला. मराठा आरक्षण ,मुस्लिम आरक्षण ,ओ.बी.सी.आरक्षण यावर एक शब्दही  न काढणाऱ्या आमदारांनी विधानसभेत साधा एक प्रश्नही विचारला नाही. ४० वर्षात विकास झाला नाही असे विरोधक म्हणतात मग तुम्ही तालुक्यातील धरणांचे जलपूजन कसे करतात? ही धरणे कोणी केली असा सवाल केला. विद्यमान आमदारांनी 12 कोटीचे सोडा एक ही रुपया अकोले नगरपंचायत साठी आणलेला नाही.

जालिंदर वाकचौरे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी असतांना विधान परिषदेच्या निवडणुकीत 6 पैकी 4 जागा भाजपच्या आल्या आहेत असे सांगत पंतप्रधान मोदीं यांच्या कार्याचा आढावा घेतला. आर पी आय नेते विजयराव वाकचौरे यांनी राज्यात दलित महिलांवर अत्याचार होत असून राज्यसरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असल्याची टीका केली. तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे म्हणाले की, दूध संघाचे रिबेट व अगस्ती कारखान्यामुळे अकोलेची बाजारपेठ फुलली असल्याचे सांगितले. प्रथम नगराध्यक्ष ऍड के डी धुमाळ यांनी नगरपंचायत च्या विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी सोमेश्वर उर्फ बबलू, धुमाळ,आर.पी.आय.नेते चंद्रकांत सरोदे,शांताराम संगारे, जेष्ठ नेते गिरजाजी जाधव, रमेशराव धुमाळ,प्रथम नगराध्यक्ष ॲड.के.डी धुमाळ,ॲड वसंतराव मनकर, माजी नगरसेवक परशराम शेळके, राजु अत्तार,श्री क्षीरसागर आदींनी आपली मनोगते व्यक्त करून भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हितेश कुंभार यांनी केले, आभार राहुल देशमुख यांनी मानले.

वाघ म्हतारा झाला तरी त्याचे खाणे सोडत नाही तर मी म्हतारा झालो तरी विरोधकांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. आपण 40 वर्षे तालुक्याचे विकासाचे काम केले. कुणाचे वाईट कधी केले नाही. कधीही गोरगरिबांचे रेशन चोरले नाही व चोरुही दिले नाही असा टोला लगावत आमदारांनी तालुका जातीद्वेशाचे दिशेने चालवला असल्याचा आरोप माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत झालेली चूक परत करू नका,आता आपल्याला करंटे राजकारण सम्पवायचे आहे असे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी देशात अतिशय चांगले काम केले असून लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. ते सबका साथ सबका विकास या प्रमाणे काम करीत आहे.

Web Title: Akole Nagar panchayat Election Shivjirao Dhumal 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here