Home अकोले अकोलेतील बालाजी वाईन्स खटपट नाका येथील बनावट दारू बनविणारा कारखाना उध्वस्त, चौघे...

अकोलेतील बालाजी वाईन्स खटपट नाका येथील बनावट दारू बनविणारा कारखाना उध्वस्त, चौघे ताब्यात

Akole raid Balaji Wines Destroys counterfeit liquor factory

Akole | अकोले: राज्य उत्पादन शुल्क आणि अहमदनगर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने खटपट नाका ता. अकोले येथे धाड (raid) टाकून या पथकाने बनावट दारू बनविणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी रिकाम्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या देशी दारूच्या बाटल्या, सेलोटेप व इतर असा १० हजार ५३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संगमनेर कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथक व राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त मोहिमेत ३० मार्च रोजी बालाजी वाईन शॉप खटपट नाका ता. अकोले येथे धाड टाकण्यात आली. यावेळी रात्रभर काही कामगार हे बनावट मद्य बनवून अवैधरीत्या विक्री करत असल्याची खात्री झाल्याने टाकलेल्या धाडीत रिकाम्या बाटल्यांमध्ये विदेशी दारू व देशी दारूचे मिश्रण करून बाटल्यामध्ये भरून बुचे लावून बनावट माल करताना मिळून आले. यावेळी पथकाने रिकाम्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या देशी दारूच्या बाटल्या, सेलोटेप व इतर साहित्य असा एकूण १० हजार ५३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी व्यवस्थापक महेश लिंगय्या हिरेचगिरी, व तीन कामगार साईकिरण बल्यागडम व प्रशांत गौड मुंजा आणि शंकर अंजगैर वन्हेला (सर्व रा.तेलंगणा, ह.मु.अकोले) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्याविरुद्ध दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Web Title: Akole raid Balaji Wines Destroys counterfeit liquor factory

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here