Home अकोले पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग नियोजित सर्वेप्रमाणे अकोले तालुक्यातून करण्यासाठी आंदोलन

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग नियोजित सर्वेप्रमाणे अकोले तालुक्यातून करण्यासाठी आंदोलन

Akole Railway Kruti samiti agitation

Akole: पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग नियोजित सर्वेप्रमाणेच अकोले तालुक्यातून करण्यात यावा या व अन्य मागण्यांसाठी अकोल्यात सोमवारी सकाळपासून तहसील कार्यालयासमोर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग कृती समितीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश नवले, स्वाभिमान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले, निलेश तळेकर, नगरसेवक प्रमोद मंडलिक, प्रदीप हासे, मनसे तालुकाध्यक्ष दत्ता नवले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

याबाबत अकोले तालुका तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले आहे, निवेदनात म्हंटले आहे की, महारेल पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्व पाहणी आणि प्राथमिक सर्वेनुसार बोटा, घारगाव, पेमगिरी, देवठाण, सिन्नर मार्गाने नाशिकला जात होता, परंतु प्रत्यक्षात मात्र या रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम साकुर, अंभोरे, माळवाडी, पोखरी हवेली, जोर्वे या भागातून कसे काय चालू आहे.

Web Title: Akole Taluka Railway Kruti samiti agitation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here