अकोले तालुक्यात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त सप्ताह उत्साहात संपन्न
अकोले प्रतिनिधी : प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये श्री दत्त महाराज जयंती निमित्त अखंड जप नाम, व गुरुचरित्र पारायण सप्ताह उत्साहात पार पडला.
दि.23 डिसेंबर ते दि.29 डिसेंबर या कालावधीत सप्ताहामध्ये 51 सेवेकऱ्यांनी सामुदायिक वाचन करून गुरुचरित्र पारायण केले.तसेच श्री स्वामी समर्थ चरित्र वाचन व श्री दुर्गसप्तशती,नवनाथ पारायण,ग्रंथाचे वाचन दररोज करण्यात आले.दि.29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सर्व सेवेकऱ्यांनी अवधूत चिंतन श्री दत्त असा तिन वेळा जयजयकार केला.व श्रीकृष्णाचा पाळणा हलवून आनंदोत्सव साजरा केला. दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता नैवेद्य आरती होऊन संजूकाका हुजबंद व मनाली रासने,एस.के मंडलिक व सेवेकऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सप्ताह काळात आलेले अनुभव सांगण्यात आले.त्याच प्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुरुष व महिला सेवेकऱ्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.शेवटी महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.या निमित्ताने सेवा केंद्र परिसरात सडा रांगोळी करण्यात आले होती.
तालुक्यातील जवळपास १५ केंद्रातून श्री दत्त जयंती निमित्ताने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच तालुक्यातील राजूर केंद्रा मध्ये संतोष उंबरे सर यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चित्र रेखाटण्यात आले होते.
Web Title: Akole Shri Swami Samarth Seva Kendra on the occasion of Shri Dutt Jayanti