Home अकोले अकोले: गर्भपात केल्याने नवविवाहितेने विहिरीत उडी मारून संपविले जीवन

अकोले: गर्भपात केल्याने नवविवाहितेने विहिरीत उडी मारून संपविले जीवन

Suicide: विहिरीत उडी घेऊन नवविवाहितेची आत्महत्या, पती व सासू वर गुन्हा दाखल.

Akole Suicide newlyweds ended their lives by jumping into a well after having an abortion

अकोले: अकोले तालुक्यातील टाहाकारी येथील सोनाली मयूर एखंडे या नवविवाहितेने पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनालीचा मयूर याच्याशी चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सोनालीचा पती मयूर एखंडे, सासू मंगल एखंडे यांनी तिच्याकडे तुझ्या माहेरून पाच लाख रुपये आणावेत असा तगदा लावला होता. मात्र आई वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने पती व सासूला पाच लाख रुपये देऊ शकले नाही. याचदरम्यान सोनाली ही गर्भवती राहिल्यानंतर पती व सासूकडून मोठ्या प्रमाणावर छळ सुरु झाला. तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे नेऊन तिचा बळजबरीने गोळ्या देण्यात आला असा आरोप सोनालीच्या चुलत्याने केला आहे. त्यांनतर तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तिला होणारे अपत्य तिला पाहिजे होते. मात्र पती आणि सासू पुढे चालू शकले नाही. आणि म्हणून अखेर तिने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.

याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात सोनालीचे वडील विजय एकनाथ आंबरे यांच्या फिर्यादीवरून पती मयूर हौशीराम एखंडे व सासू मंगल हौशीराम एखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहे.

Web Title: Akole Suicide newlyweds ended their lives by jumping into a well after having an abortion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here