Home अकोले अकोले तालुक्यात आज ३ नवे करोनाबाधित, नववा मृत्यू

अकोले तालुक्यात आज ३ नवे करोनाबाधित, नववा मृत्यू

Akole Taluka 3 corona new patient and one death

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज तीन नवीन कोरोना बाधित तर शहरातील कारखाना रोडवरील एक व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ३२६ इतकी झाली आहे.

आज बुधवारी सकाळी कारखाना रोडवरील ७१ वर्षीय व्यक्ती घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असताना मयत झाला आहे. तर आज खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अमृतनगर नवलेवाडी, हिवरगाव आंबरे, व कळस येथील प्रत्येकी एक असे तीन व्यक्तीचा अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आला आहे. यामध्ये शहरालगत नवलेवाडी येथील अमृतनगर येथील ७६ वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथील ५८ वर्षीय  पुरुष तर कळस येथील ३७ वर्षीय पुरुष अशा तीन व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तर आज दिवसभरात खानापुर कोविड सेंटर येथे बाधितांच्या संपर्कातील ५१ व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले असुन ते अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे उद्या सायंकाळ पर्यत त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील एकुण संख्या ३२६ झाली आहे.त्यापैकी २३० व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सध्या ८७ व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर ०९ व्यक्ती मयत झालेल्या आहे.

अलताफ ईस्माईल शेख संपर्क (७३८७०२०५९७) पञकार, अकोले

See Latest Marathi news

Web Title: Akole Taluka 3 corona new patient and one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here