Home अकोले अकोले तालुक्यात बुधवारीही ०५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

अकोले तालुक्यात बुधवारीही ०५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Akole Taluka 5 Corona Patient Yesterday

अकोले: तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात ५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३०७३ इतकी झाली आहे.

आज तालुक्यात घेण्यात आलेल्या  रॅपिड २३ ॲन्टीजन टेस्टमध्ये ०० व्यक्तीचा  व खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०३ तर अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात ०२ व्यक्ती अशी एकुण ०५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

आज अकोले  ग्रामीण रुग्णालय येथून २० व राजुर ग्रामीण रुग्णालय येथून २२ व समशेरपुर ग्रामीण रुग्णालयातुन २८ अशी एकुण ७० व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

आज  तालुक्यात घेण्यात आलेल्या २३ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये एकाही व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला नाही.

तर  खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात अकोले शहरातील ६९ वर्षीय पुरूष, लहीत बु येथील ६० वर्षीय पुरूष, गणोरे येथील ५४ वर्षीय महीला व अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील ५० वर्षीय पुरूष, झापवाडी येथील २४ वर्षीय तरुण अश्या एकुण ०५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३०७३ झाली आहे.

Web Title: Akole Taluka 5 Corona Patient Yesterday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here