Akole: अकोले तालुक्यात करोनाचा सहावा मृत्यू, एकूण २१९
अकोले | Akole: अकोले तालुक्यातील इंदोरी येथील ७४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील करोनाने मयत रुग्णांची संख्या सहा इतकी झाली आहे.
त्याच्यावर करोनाचे उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. त्याचा चार ते पाच दिवसांपूर्वी करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल त्याला श्वसनाचा अधिक त्रास होऊ लागल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान मंगळवारी उशिरा प्राप्त अहवालात आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. कारखाना रोड व लोकमान्य रोड पोस्ट ऑफिस जवळ ५३ वर्षीय दोन महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मेहंदुरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या २१९ इतकी झाली आहे. त्यातील १५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या ५५ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.
Web Title: Akole taluka Corona infected death
Get Latest Marathi News and Ahmednagar News