Home अकोले अकोले तालुका बनतोय बिबट्याच्या कातडी, नखांच्या तस्करीचे केंद्र

अकोले तालुका बनतोय बिबट्याच्या कातडी, नखांच्या तस्करीचे केंद्र

Akole News:  बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी करणाऱ्या (smuggling of leopard skins and nails) अकोले तालुक्यातील उडदावणे व शरणखेल येथील टोळीच्या मुसक्या पोलीस आणि वनविभागाने आवळल्या.

Akole taluka is becoming a hub for the smuggling of leopard skins and nails

अकोले: शहापूर, आळेफाटा परिसरात बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी करणाऱ्या अकोले तालुक्यातील उडदावणे व शरणखेल येथील टोळीच्या मुसक्या पोलीस आणि वनविभागाने आवळल्या आहेत. या टोळ्यांमुळे बिबट्यासह वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अकोल्यात गंभीर बनला आहे. अकोले हे तालुका बिबट्याच्या कातडी, नखांच्या तस्करीचे केंद्र बनले आहे. अकोले तालुक्यातील तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कळसुबाई – हरिश्चंद्र गड अभयारण्यातील उडदावणे परिसरात गेल्या दोन आठवड्यापुर्वी गावातील नागरिकांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याचे नखे आणि काही अवयव काढुन त्याच्या शरीराचा बाकीचा जाळुन पुरावा नष्ट करण्यात आला. आठवडाभरानंतर बिबट्याचे नख विक्रीसाठी आलेल्या तस्करांना शहापूरच्या वनविभागाने चांढे नाक्यावर नकली ग्राहक पाठवुन ताब्यात घेतले. भाऊ गांगड (वय ३४), काळु गिन्हे (वय २४) आणि पांडुरंग उघडे (रा.उडदावणे) या तिघांना ताब्यात घेऊन बिबट्याची सहा नखे व मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर डोळखांब वनपरिक्षेत्र कार्यालयात भा.दं.वि. वनसंरक्षक कायदा १९७२ च्या कलम ९, ५१, ४८ क, आणि ४९ ब अ ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे नाशिक महामार्गावरील हॉटेल फाउंटन समोरून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले होते. बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी व शिकार करणाऱ्या टोळ्या अकोले तालुक्यासह पुणे, ठाणे जिल्ह्यात सक्रिय असल्याचे वास्तव समोर आले आहे. या टोळ्यांवर वनविभाग आणि वन्यजीव विभागाने लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Web Title:  Akole taluka is becoming a hub for the smuggling of leopard skins and nails

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here