Home अकोले Akole: आज बुधवारी तालुक्यात १० व्यक्ती कोरोना बाधीत

Akole: आज बुधवारी तालुक्यात १० व्यक्ती कोरोना बाधीत

Akole Taluka Today 10 corona positive

अकोले | Akole: अकोले शहर ०५, शेंडी ०२, कळस बु, गर्दणी, पिंपळदरी प्रत्येकी १ सह आज तालुक्यात १० व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

आज तालुक्यात घेण्यात आलेल्या ५९ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ०७ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०३ व्यक्ती अशी एकुण १० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

आज अकोले ग्रामीण रुग्णालय येथून १७ , कोतूळ ग्रामीण रुग्णालयातुन १७  अशी ३४ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील शिवाजीनगर येथील २६ वर्षीय तरुण,४९ वर्षीय महीला,कारखाना रोडवरील २८ वर्षीय तरुण, कळस बु येथील ६० वर्षीय महीला,गर्दणी येथील ३५ वर्षीय पुरूष, शेंडी येथील ०६ वर्षीय मुलगी,२० वर्षीय महीला अशी  ०७ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात पिंपळदरी येथील ६० वर्षीय महीला,शहरातील धामणगाव रोडवरील ८५ वर्षीय पुरूष, शिवाजीनगर येथील ५७ वर्षीय पुरूष अशी आज एकुण १० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ३०४४ झाली आहे.

Web Title: Akole Taluka Today 10 corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here