Home अकोले अकोले तालुक्याला हादरा: एकाच दिवशी १४ करोनाबाधित

अकोले तालुक्याला हादरा: एकाच दिवशी १४ करोनाबाधित

Akole taluka today 14 corona infected

अकोले(Akole): अकोले तालुक्याला पुन्हा एकदा करोनाने हादरा दिला आहे. एकाच वेळी १४ रुग्ण आढळून आल्याने करोनाबाधितांच्या संख्येने शतक पार केले आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या ११० इतकी झाली आहे. 

आज बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यातील माणिक ओझर येथील तब्बल १० रुग्ण आढळून आले आहेत तर राजूर येथे दोन, वाघापूर एक व निंबळ येथे एक करोनाबाधित आढळून आला आहे. 

माणिक ओझर येथील ४२,३४,३३,२२ वर्षीय पुरुष, ६०,४८,३७ वर्षीय महिला व १४,५,१ मुलांना करोनाची बाधा झाली आहे. 

राजूर येथे ६० व ३० वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ४५ वर्षीय पुरुष तर तालुक्यातील निम्ब्रळ येथे पहिल्यांदाच शिरकाव २१ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या ११० झाली आहे. ६६ जण करोनामुक्त झाले आहेत. ३ मयत तर ४१ जणांवर उपचार सुरु आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka today 14 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here