अकोले उपजिल्हा रुग्णालय मंजुरी; आ. लहामटे- पिचड यांच्यात श्रेयवाद सुरु
Akole Hospital: उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीवरून आजी माजी आमदार यांच्या समर्थकात सोशल मिडियात श्रेयवादाची लढाई सुरू.
अकोले: येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीवरून आजी माजी आमदार यांच्या समर्थकात सोशल मिडियात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. आपल्याच नेत्याला श्रेय देताना विरोधी नेत्यांवर टीका टिप्पणी सुरू केली जात आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असल्याबद्दल राज्य शासनाच्या कारभाराचे गोडवे गाताना दिसत आहेत.
अकोले ग्रामीण रुग्णालय 30 खाटांचे श्रेणीवर्धन करुन 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाच्या 37 कोटी 85 लाख प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात असतानाच आजी माजी आमदार व खासदार यांच्या समर्थकांत मात्र श्रेयवादाची लढाई सोशल मीडियावर सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
माजी आमदार वैभवराव पिचड,आमदार डॉ किरण लहामटे व खासदार सदाशिव लोखंडे यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांनी आभार मानले आहेत.आजी माजी आमदार व खासदार याप्रश्नी शासनाचे आभार मानत असतांना दुसरीकडे तालुक्यातील त्यांचे समर्थकांनी श्रेयवादाची लढाई सुरू केली आहे.सोशल मीडियावर एकमेकांची ऊनी धुनी हे कार्यकर्ते काढत आहेत.खरे तर अनेक वर्षांपासून आजी माजी आमदार व खासदार हे या कामासाठी राज्यशासनाकडे आपापल्या परीने पत्रव्यवहार करत होते,त्यासाठी पाठपुरावा करत होते.अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच अद्ययावत उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल सर्वसामान्य नागरिक मात्र विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असल्याबद्दल राज्य शासनाच्या कारभारावर खुश असल्याचे दिसत आहेत.
उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीवरून आजी माजी आमदार,खासदार यांच्या समर्थकात सोशल मिडियात श्रेयवादाची लढाई,सर्वसामान्य नागरिक मात्र विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असल्याबद्दल राज्य शासनाच्या कारभारावर खुश आहेत. पण आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवाद सुरु झाला असून वेगवेगळ्या ठिकाणी आपापले बॅनर पाहायला मिळत आहे.
Web Title: Akole Upazila Hospital Approval Come to Shreyaism between Lahamte-Pichad
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App