Home अकोले अकोले: सेल्फी पडला महागात, तरुण पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू

अकोले: सेल्फी पडला महागात, तरुण पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू

Akole Young tourist drowns

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील हरीश्चंद्रगड मध्यावर असणाऱ्या डोहात बुडून औरंगाबाद येथील तरुण पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर मधुकर दांडाइत वय २१ रा. औरंगाबाद असे या तरुणाचे नाव आहे. औरंगाबाद येथील पर्यटक तरुण भटकंतीसाठी हरीश्चंदर गड परिसरात मंगळवारी आले होते. हा गड चढत असताना गडाचा दुसरा टप्पा चढून गेल्यावर काही जण निसर्गाचे फोटो काढत होते तर काही जण सेल्फी घेत होते. मागील आठवड्यात या परिसरात मुसळधार पाउस कोसळला होता. या परिसरातील ओढे नाले भरून वाहत आहे. या ठिकाणावरील डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज ना आल्यामुळे ज्ञानेश्वरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सोबतीला असणाऱ्या मित्रांनी त्याला बाहेर काढून गडाच्या खाली आणले व वाहनात टाकून राजूरच्या दिशेने निघाले. राजूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी राजूर येथे वाहन आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितली.

Web Title: Akole Young tourist drowns

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here