Home क्राईम संगमनेरात कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, एकावर गुन्हा दाखल

संगमनेरात कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, एकावर गुन्हा दाखल

Sangamner Raid:  कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या जनावरांची पोलिसांनी छापा टाकून सुटका, एकावर गुन्हा दाखल (Ahmednagar News).

Animals tied up for slaughter were freed after police raid

संगमनेर:  तालुक्यातील कुरण परिसरात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या जनावरांची पोलिसांनी छापा टाकून सुटका केली आहे. याप्रकरणी एकाजणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरण परिसरात इरफान शेख यांच्या घराच्या बाजूला 5 जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन उगले व सहकार्‍यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पाच जनावरे आढळून आली. पोलिसांनी सदर जनावरांची सुटका केली आहे.

याबाबत पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आस्लम बालम शेख याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि 1976 चे सुधारीत सन 1995 चे कलम 5(अ), 1, 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागण्यास अधिनियम 3,11 नुसार गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहे.

Web Title: Animals tied up for slaughter were freed after police raid

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here